भाविकाला पूजेसाठी १४ वर्षे वाट पाहायला लावल्याने तिरुपती देवस्थानला दंड, काय आहे प्रकरण ?

0
36

दिल्ली – प्रसिद्ध तिरुपती देवस्थानबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दरवर्षी कोट्यावधी भाविक तिरुमला येथील तिरुपतीच्या दर्शनासाठी येतात. तिथे विशेष पूजेसाठी महिनोनमहिने बुकिंग होत असते, त्यासाठी वेटिंगही फार महिन्याने लागते. परंतु एका भाविकाला विशेष पूजेसाठी तब्बल १४ वर्ष वाट पाहायला लावल्याने देवस्थानला ४५ लाखांचा दंड भरण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केआर हरी भास्कर नावाच्या व्यक्तीने २००६ मध्ये वस्त्रलंकार व विशेष पूजेसाठी १२,२५० रुपयांचे बुकिंग केले होते. मंदिराने त्यांना २०२० मध्ये स्लॉट बुकींग दिली, पण कोरोना महामारीमुळे मंदिर ८० दिवस बंद होते. त्यानंतर मंदिर उघडल्यानंतर वस्त्रलंकारासह इतर सेवा आणि विशेष पुजावर बंदी घालण्यात आली होती.

अशा परिस्थितीत मंदिराने भास्करचे बुकिंग रद्द केले आणि त्यांना व्हीआयपी ब्रेक दर्शन किंवा पैसे परत करण्याचा पर्याय दिला. यानंतर भास्करने वस्त्रलंकार सेवा पुन्हा सुरू करण्यास सांगितले, परंतु मंदिर प्रशासन भास्करला पैसे परत घेण्यासाठी अडून बसले. अशा स्थितीत अखेर हरी भास्कर यांनी तामिळनाडूतील सेलम येथील ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

भास्करने सेलमच्या ग्राहक न्यायालयात आपली तक्रार दाखल केली. कोर्टात संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर, अखेर तिरुपती देवस्थानने २००६ पासून आजपर्यंत वार्षिक ६% व्याजदराने १२,२५० रुपये भास्करला परत करावेत असा निर्णय देत भाविकाला योग्यवेळी दर्शन न दिल्यामुळे ४५ लाख रुपये दंड भरण्याचे किंवा वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here