दिल्ली – दुबईत भारतीय आणि पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या आशिया कप खेळत आहेत. दोन्ही संघात दुखापतींमुळे अनेक खेळाडू संघातून बाहेर पडले आहेत. पण भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने पाकिस्तानच्या खेळाडूबाबत एक विधान केले आहे.
आर. अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर जखमी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी इतर गोलंदाजांवर काही कमेंट्स केल्या. त्याला उत्तर देत अश्विन म्हणाला, गेल्यावेळी आम्ही पाकिस्तानचा सामना केला तेव्हा शादाब खान आणि हरिस रौफ यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीने खेळ बदलला. आफ्रिदीची दुखापत हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे.
तो असाही म्हणाला, मी खूप विचार केला की जर शाहीन आयपीएल लिलावात असता तर त्याला १४-१५ करोड रुपये मिळाले असते. कारण एक उंच डावखुरा वेगवान गोलंदाज जो नवीन चेंडूने गेम सेट करतो आणि डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर देखील टाकतो.
शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. ज्याचे प्रत्येक चेंडू १४०-१४५ किमी प्रतितास वेगाने तो गोलंदाजी करतो. त्याने गेल्या विश्वचषकात भारताच्या प्रमुख फलंदाजांना स्वस्तात बाद केले होते, त्यामुळेच पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला होता. तो यंदा पायाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम