प्रश्न विचारल्याने संतापलेल्या भाजप आमदाराने महिलेला केली शिवीगाळ

0
29

बंगळूरू – कर्नाटकातील बंगळूरूमध्ये भाजप आमदाराने समस्या मांडणाऱ्या एका महिलेला शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. तसा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये बंगळुरुच्या वर्थुरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या समस्या मांडण्यासाठी गेलेल्या या महिलेला भाजपा आमदार अरविंद लिंबवली यांनी सर्वांसमोर शिवीगाळ तर केलीच, पण तक्रारीचा कागद फाडून तिच्याशी गैरवर्तनदेखील केले आहे. तसेच, या आमदाराने महिलेला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, जिच्याशी गैरवर्तन आमदाराने केले, ती महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. व्हिडिओ समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे. तसेच या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घ्यावी, अशी मागणी कर्नाटकातील काँग्रेस आमदार दिनेश गुंडू राव यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here