विठेवाडीत येथे शरद जोशी यांची जयंती साजरी

0
9
विठेवाडीत येथे शरद जोशी यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना तालुका अध्यक्ष माणिक निकम, महेंद्र आहेर आदी (छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; शेतकऱ्यांचे दैवत शेतकरी संघटनेचे प्रणेते कै. शरद जोशी यांची८७ वी जंयती विठे्वाडी येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी कै .शरद जोशी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित केले होते, आपल्या घरादाराची चिंता न करता, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावले, शेती मालाला उत्तपादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून, ८० च्या दशकात लाखो शेतकऱ्यांना संघटीत करून त्यांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी रास्तारोको, रेल्वे रोको सारखे आंदोलन करुन सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते अशा शब्दात कुबेर जाधव यांनी कै शरद जोशी यांच्या कार्याचा गौरव केला.

विठेवाडीत येथे शरद जोशी यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना तालुका अध्यक्ष माणिक निकम महेंद्र आहेर आदी छाया सोमनाथ जगताप

शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष माणीक निकम यांनी कै शरद जोशी यांनी उस आणि कांदा भावासाठी फार मोठा लढा देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असल्याचे म्हटले , कै शरद जोशी यांच्या प्रतिमेचे विकास सोसायटी संचालक महेंद्र आहेर यांनी पुजन करुन पुष्पहार अर्पण केला.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष पंडित बापु निकम, बाळासाहेब निकम , शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते फुला जाधव,विकास संस्थेचे अध्यक्ष प्रशांत निकम , उपाध्यक्ष समाधान निकम, विलास निकम, फुला निकम ,राहुल निकम, बाळु निकम, कैलास कोकरे, संजय सावळे, तानाजी निकम, शशीकांत निकम,जिभाउ बोरसे, काशिनाथ बोरसे,राजु निकम,केदा निकम,सूनिल निकम , मिलिंद निकम, भास्कर निकम, योगेश निकम,लक्ष्मन निकम आदी सह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here