मुंबई – तमिळ चित्रपट निर्माता रवींद्र चंद्रशेखर यांनी दक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी हिच्यासोबत गुरुवारी लग्नगाठ बांधली असून सोशल मीडियावर ह्यांच्या लग्नाचे फोटोज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.
रवींद्र आणि महालक्ष्मी यांचा विवाह चेन्नईत पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने पार पडला. अभिनेत्री महालक्ष्मीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लग्नाचे फोटोज शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी खूप भाग्यवान आहे की तू (रवींद्र) माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहेस. तुझ्या प्रेमाने माझ्या आयुष्यात वेगळाच रंग भरला आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप प्रेम आणि नवीन आयुष्याची सुरुवात !”
फोटोंमध्ये महालक्ष्मी आणि रवींद्र पारंपरिक लूकमध्ये दिसत असून दोन्ही जोडप्यांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. ह्या लग्नसोहळ्यात दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी सहभागी झाले होते.
यापूर्वीही महालक्ष्मीचे पहिले लग्न झाले असून तिने अनिल यांच्याशी पहिला विवाह केला होता. अभिनेत्रीला पहिल्या लग्नापासून एक मुलगा देखील आहे. मात्र काही कारणास्तव ह्या दोघांमध्ये नाते बिघडले. आणि घटस्फोट घेताच अभिनेत्रीचे रवींद्रशी सूत जुळले.
दरम्यान, दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. पैशासाठी हे लग्न केलं असल्याचा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर हे दोघेही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम