दिल्ली – आताच एक मोठी बातमी आली आहे अफगाणिस्तानमधून. अफगाणिस्तानच्या हेरातमधील एका मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. ज्यात २० जण ठार झाले असून २१ जण जखमी झाले आहे. स्फोटातील मृतांमध्ये मशिदीतल्या मुख्य मौलवीचा समावेश आहे.
तालिबानने ह्या घटनेची माहिती दिली. हेरातमधील एका गजबजलेल्या मशिदीत शुक्रवारी दुपारच्या नमाजासाठी गर्दी झालेली असताना हा स्फोट झाला. या स्फोटात मुजीब-उल रहमान हा मशिदीचा मुख्य मौलवी ठार झाला. अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली नाही. सध्या अफगाणिस्तानात धार्मिक सप्ताह चालू असल्याने तिथल्या मशीद व इतर परिसरात मोठी गर्दी होती. त्याचवेळी हा स्फोट झाला.
स्फोटात मरण पावलेला मौलवी हा तालिबानी प्रवत्तीचा होता. अफगाणिस्तानात जेव्हा पाश्चात्य राष्ट्रांच्या अधिपत्याखाली सत्ता स्थापन झाली होती, त्यावर टीका करण्यात अग्रभागी होता. बंडखोरांचा शिरच्छेद करणे, दगडाने ठेचून मारणे, हात कापणे अशा शिक्षा द्यायला हव्यात, अशी वक्तव्ये करायचा. त्यामुळेच तो संपूर्ण अफगाणिस्तानात प्रसिद्ध होता. त्याच्या मृत्यूमुळे तालिबानचे मोठे नुकसान झाले, असे तालिबानचा प्रमुख प्रवक्ता झबिउल्ला मुहाजिद याने म्हटले आहे.
अफगाणिस्तानात गेल्यावर्षी तालिबानची सत्ता आल्यापासून दिवसेंदिवस हल्ले, आत्मघाती स्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच, देशात शिया व सुन्नी या पंथांच्या अनुयायांमध्ये सतत चकमकी होत असतात. त्यामुळे ह्या हल्ल्यांमध्ये आजवर हजारो निष्पाप नागरीक मारले गेले आहेत. त्यामुळेच तिथले नागरिक भीतीच्या सावटाखाली जगात आहे. विशेष म्हणजे, हेरातमधील मशिदीत सुन्नी पंथाचे अनुयायी प्रामुख्याने प्रार्थनेसाठी येत असतात, जे अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानमध्ये आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम