देवळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; सुदर्शनचे UPSC त यश

0
37

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात देवळा तालुक्यातील सुदर्शन सोनवणे याने यश संपादन करत इतिहास रचला आहे. नाशिक जिल्ह्यातून तीन विद्यार्थी या परीक्षेत पास झाले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले. आहे
राज्यातून मृणाली जोशी प्रथम तर विनायक नरवाडे दूस-या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार हे दोघे 36 आणि 37 व्या स्थानावर आहेत. तर नाशिकच्या श्रद्धा गुंडे हिला ३३८ क्रमांक मिळाला तर निवृत्ती आव्हाड हे १६६ क्रमांकावर राहिले आहेत. यामध्ये देवळा तालुक्यातील सुदर्शन सोनवणे हे ६९१ क्रमांकवर राहिले.

देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील सुदर्शनने तब्बल सहा वेळा अपयश पचवले. आणि तेव्हढ्याच जोमाने अभ्यास करत युपीएससी परीक्षेत सुयश प्राप्त करत अधिकारी पदाला गवसणी घातली.

सुदर्शनचे बारावीपर्यंतचे शिक्षण दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे झाले. पुढे नाशिक आणि पुणे येथे त्याचे पुढील शिक्षण झाले. सुदर्शनचे वडील राज्य परिवहन महामंडळात चालक आहेत. तर आई गृहिणी आहेत. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्याने यश संपादन केले. किती तास अभ्यासापेक्षा अभ्यासाची गुणवत्ता दर्जेदार असावी असे तो सांगतो. सुदर्शनच्या यशाने तालुक्यातील अनेकांनी अभिनंदन केले आहे. तर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

दिव्या गुंडे, नाशिक

दिव्या तशी लहानपणापासून मेहनती मुलगी. दहावीत ९२ गुण मिळवूनदेखील दिव्या यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. दिव्याचे आई व वडील प्रशासकीय सेवेत आहेत. यामुळे घरातून त्यांना बाळकडू मिळाले.

दिव्याने शालेय शिक्षण फ्रावशी अकादमीत केले. आयसीएसई बोर्डातून तिने दहावीत ९२ टक्के गुणांसह प्राविण्य मिळवले. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगताना तिने कला शाखेची निवड केली.
बारावीपर्यंतचे शिक्षण तिचे एचपीटी महाविद्यालयात झाले. पुढे पदवीसाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला ती गेली. त्यानंतर अंतिम वर्षात होती तेव्हापासून तिने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. दिव्याच्या आई जिल्हाधिकारी आहेत तर वडील हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

निवृत्ती आव्हाड , गुळवंच , सिन्नर

सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील भूमिपुत्र आणि मध्यप्रदेशातील जबलपूर येथे सहायक आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले निवृत्ती आव्हाड यांनी पुन्हा एड युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत आयएएसपदाला गवसणी घातली. सलग पाच वेळा त्यांनी मुलाखत दिली.सहाव्या प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले. त्यांना १६६ वी रँक मिळाली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here