तालुक्यातील आराई येथे आजपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच कीर्तन सोहळा

0
29

स्वप्निल अहिरे,

आराई : बागलाण तालुक्यातील आराई येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताह पांडुरंगाच्या छत्राखाली,प. पु. वै.कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या आशीर्वादाने, ह.भ.प.भानुदास महाराज दैवतकर यांच्या सुवानीतून व हभप. वै.नागू गंगाराम अहिरे व ह.भ.प. वै. बारकू दादाजी निकम यांच्या आशीर्वादाने व ह.भ.प. अविनाश महाराज आराईकर यांच्या मार्गदर्शनाने सालाबादाप्रमाणे आज दि. १ सप्टेंबर पासून गुरूवार दि. ८ सप्टेंबर पर्यंत भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे.

हरिनाम सप्ताह मध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा आरती, सकाळी आठ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी तीन ते पाच पारायण, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरी किर्तन जागरण असे  कार्यक्रम होणार आहेत. १ सप्टेंबर रोजी ह.भ.प. कु.ऋतुजा ताई महाराज वाखारीकर, २ सप्टेंबर रोजी ह.भ.प. कीर्तन केसरी संजय (नाना) महाराज धोंडगे मकरंद वाडीकर ३ सप्टेंबर ह.भ.प. किशोर महाराज वाकेकर, ४ सप्टेंबर ह.भ.प. रविंद्र महाराज तारखेडकर, ५ सप्टेंबर रोजी ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर  अनंतदासजी महाराज कजवाडे, ६ सप्टेंबर रोजी ह.भ.प. चेतन महाराज मालेगावकर, ७ सप्टेंबर रोजी ह.भ.प. शाम महाराज गांगुर्डे दिघवदकर, तसेच  ८ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प. पंकज महाराज एकतासकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येईल.

या हरिनाम सप्ताह काळात सर्व किर्तन सेवा व भव्य महाप्रसादाचे आयोजन श्रीराम भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, महाप्रसादाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान अखंड हरिनाम सप्ताह समिती व श्रीराम भजनी मंडळ ग्रामपंचायत, दक्षिण, उत्तर सोसायटी, बागायतदार पाणी पुरवठा संस्था, नवयुवक मित्र मंडळ, सर्व ग्रामस्थ यांच्या तर्फे करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here