तालिबान सुरू करणार फाशी अन हात कापायची शिक्षा ?

0
34

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; अफगाणिस्तान मध्ये तालिबान चा कहर संपता संपत नाहीये. आत्ता पर्यंत तालिबान ने अनेक प्रकारचे नियम लादून अफगाणिस्तान मधील नागरिकांना जेरीस आणलं आहे. तालिबान ने अफगाण मध्ये सत्ता स्थापन केली आहे. आणि स्वतःचे मंत्रिमंडळ देखील स्थापन केले आहे.

तालिबान ने आता लवकरच फाशी आणि हात कापायची शिक्षा पुन्हा सुरू करण्याचा विचार असल्याचं बोलून दाखवलं आहे. तालिबान नेता मुल्ला नुरुद्दीन तुराबी याने याबाबत वक्तव्य केले आहे. तुराबी हा आधीच्या तालिबान सरकार मध्ये कायदे मंत्री होता. आता तुराबी द्वारे अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आल्याने, अफगाणिस्तान मधील नागरिकांच्या सुरक्षेबाबत अधिक चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

आता पर्यंत तालिबान ने महिला वर्गावर अनेक प्रकारचे निर्बंध लादून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. आणि तालिबान सत्ता स्थापन केल्यापासून कठोरात कठोर नियमांची घोषणा करू लागला आहे. तालिबान शरियत कायद्याचा अवलंब करणार आहे. आणि त्यात असे एका मागे एक भयावह निर्णय तालिबान घेत असल्याने, जगाने देखील चिंता व्यक्त केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here