कर्मवीर रामरावजी आहेर, महाविद्यालयात रा.से. यो. दिनानिमित्त वृक्षारोपण

0
45

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा महाविद्यालयात २४ सप्टेंबर २०२१ राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या आवारात व शासकीय आय टी आय मध्ये,भारतीय प्रजातींची वड, पिंपळ, करंज, काशीद, शिसव, उंबर, इत्यादी वृक्षांचे रोपांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

प्राचार्य श्री हितेंद्र आहेर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. आण्णासाहेब पवार, सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वृक्षमित्र व महाविद्यालयाचे माजी स्वयंसेवक श्री सुनील आहेर प्रमुख पाहुणे होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक व कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.के.आहेर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सतीश ठाकरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयमाला चंद्रात्रे, प्रा. आर. बी. घोडे, स्वयंसेवक अंजली आहेर, शिवानी इंगळे, अनिकेत आहेर, शुभम आहेर, माधुरी जाधव, ऋत्विक काकवीपुरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here