निसर्गप्रेमी राहुल गवळी , कोकणगाव
हल्ली आपण अशा गोष्टी ऐकत आहोत ,की या मानवी जीवनामध्ये अविश्वसनीय आहेत. म्हणजेच अलीकडच्या काळात मानवी जीवनात असे आमूलाग्र बदल होत चालले , आहे की त्यावर आपण माणूस म्हणून विश्वासच ठेवु शकत नाही. ते बदल निसर्गात घडत आहे. पण त्याचा थेट प्रभाव हा आपल्या मानवी जीवनावर पडत आहे. म्हणजे अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांवर आपण प्रकाश टाकला तर त्यात माझ्या वाचनात आलेल्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर डोके गरगरायला लागते. त्या म्हणजे सूर्यमालेतील ऊर्जा देणारा महत्वाचा ग्रह सूर्य. त्या सूर्याची दाहकता काही प्रमाणात कमी झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा, तसेच आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर परिणाम होणे या बाबींवर आपण स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायला हवा की हे असे का घडत असावे?
सर्वात मोठा बर्फाचा प्रदेश खंड असणाऱ्या अंटार्क्टिका खंडावर जागतिक तापमानाने एक महाकाय हिमखंड अंटार्क्टिका खंडापासून वेगळा होऊन त्याचे रूपांतर हळूहळू पाण्यात होत आहे परिणामी आपल्या पृथ्वीवरील पाण्याची पातळी वाढत आहे आणि ही बाब आपल्या साठी भविष्यात चिंतेचा विषय बनणार आहे. माझ्या मते हवामान बदलाला काही अंशी आपणच जबाबदार आहोत. आपण कृत्रिमरित्या तयार केलेल्या अनेक वस्तू या हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतात, तसेच या जीवनासाठी तयार केलेल्या ऐशोआरामाच्या वस्तूंचा उपयोग आपण अति प्रमाणात करतो आहे.
उदा.मोठ- मोठ्या शहरांमध्ये आपण सार्वजनिक वाहनांचा उपयोग न करता, प्रत्येक व्यक्ती आपले वैयक्तिक वाहन वापरून कोणत्याना कोणत्या प्रकारे मानवी जीवन प्रदूषित करण्याचे काम करत आहोत. निसर्ग वाचवणे ही आपली जबाबदारी आहे हे आपण जणू विसरूनच गेलो आहे, पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची हवी की आपण या पृथ्वीवर मर्यादित कालावधी साठी पाहुणे म्हणून आलो आहे ना की मालक बनुन. त्यात अनेक प्रकारच्या साथीच्या रोगाचे बळी आपण पडत आहोत ते ही मानव निर्मितीच आपण केलेल्या नवनवीन संशोधनाचे दुष्परिणाम. त्यात मी म्हणनार नाही की पूर्ण साथीचे रोग हे मानवनिर्मित असतील पण काही नैसर्गिक ही असतील पण त्याला थोडासा तरी आधार हा कदाचित मानव निर्मितीच असेन असे माझे स्पष्ट मत आहे.
त्यात मी ऐकलेले साथीचे रोग प्लेग, स्वाईन फ्लू अशी अनेक असतील पण या संकटावर आपण लवकर विजय मिळवला पण त्याला अपवाद म्हणून आता आपल्या जीवनात अचानक पणे ठाण मांडून असलेला एक साथीचा रोग म्हणून कोविड-19 मला तर अजूनही विश्वास बसत नाही की असाही रोग आपल्या मानवी जीवनात येऊन बसलाय अर्थात तो मानव निर्मित की नैसर्गिक हे सिद्ध व्हायचे आहे. पण तो कदाचित मानवनिर्मित असू शकतो , हे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे आज आपण बघतोच आहे या साथीच्या रोगाने आपले आयुष्य किती उदवस्त केले आहे माणूस माणसजवळ जाऊ शकत नाही. एकमेकांशी गप्पा मारू शकत नाही त्या रोगाची दाहकता इतकी आहे की तो ज्याला जडला त्याची इच्छाशक्ती कमी असेल तर तो या जीवनाचा मुकणार. पर्यायी माणसे आपल्याशी न बोलताच निघून चाललेली आणि म्हणूनच आपण विचार करायला हवा की असे का घडत असावे आणि हे जे घडते आहे ते बदलण्यासाठी आम्ही मानव जाती म्हणून काय करायला हवे. तर या पृथ्वी मातेला या संकटाच्या कचाट्यातुन बाहेर काढण्यासाठी शासना मार्फत जे काही पर्यावरण विषयक नियम ठरवून दिले आहेत त्याचे काटेकोरपणाने पालन करावे. पर्यावरण वादी लोकांची भेट घेऊन वातावरनाचा समतोल कसा राखावा यावर चर्चा करावी. महत्वाचे म्हणजे यात युवापिढीने प्रामुख्याने सहभाग नोंदविला पाहिजे मी ही युवा आहे त्या अनुषंगाने मी आज हा लेख लिहुन तुमच्या पर्यंत पोहचण्याचा केलेला हा प्रमाणिक प्रयत्न..
9822306630
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम