
देवळा : खुंटेवाडी ता.देवळा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ठगुबाई पवार यांची तर उपसरपंचपदी युवा उद्योजक राजीव पगार यांची गुरुवार (ता.२५) बिनविरोध निवड करण्यात आली.

खुंटेवाडी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाऊसाहेब पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नऊच्या नऊ जागांवर विजय मिळविला होता. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक राजेश वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती.
निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी ठगुबाई पवार तर उपसरपंचपदासाठी युवा उद्योजक राजीव पगार यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उभयतांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश वाघेरे यांनी जाहीर केले. नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.
बैठकीस नूतन सदस्य संजय भामरे, बाळू पवार, मीना निकम, भाऊसाहेब जाधव, वैशाली जाधव, भारती भामरे, सुनीता गांगुर्डे उपस्थित होते. यावेळी छायाचित्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उद्धव भामरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ.निंबा भामरे, दादाजी भामरे, माजी उपसरपंच विनोद पगार, हिरामण सावकार, अनिल पगार, विजय भामरे, पांडुरंग भामरे, चंद्रकांत भामरे, जिभाऊ भामरे, तुकाराम भामरे, किरण भामरे, संदीप भामरे, योगेश भामरे, साहेबराव भामरे, प्रशांत भामरे, केवळ पगार, शरद खैरणार, संदीप पगार, पंकज सावकार, सुभाष पगार, दिलीप आहेर, समाधान सागर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
आगामी पाच वर्षात गावात नवनवीन विकासकामे करत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नूतन सरपंच ठगुबाई पवार व उपसरपंच राजीव पगार यांनी यावेळी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम