भाजपाचे टार्गेट ‘आप’ ; 5 कोटींना आमदार फोडण्याचा प्रयत्न?

0
11

दिल्ली: नवीन दारू धोरणाविरोधात दिल्लीच्या नायब राज्यपालांनी सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह अनेक राज्यांमध्ये सीबीआयने छापे टाकल्यानंतर आप विरुद्ध भाजपा संघर्ष पेटला आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाकडून त्यांचे आमदार भाजपा कडून फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेताना आपल्या पक्षाच्या आमदारांना भारतीय जनता पक्षापासून तोडण्यासाठी ५-५ कोटींची ऑफर दिली जात असल्याचा आरोप केला. सौरभ भारद्वाज म्हणाले की, ऑपरेशन लोटस सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरले आहे.

आप’चा भाजपवर मोठा आरोप
‘आप’च्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधान 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर जे भाषण देतात. ते प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतात परंतु सर्वात महत्वाच्या ऑपरेशनबद्दल बोलत नाही. हे ‘ऑपरेशन लोटस’ आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा-जेव्हा निवडणुकीत जनतेने राज्य सरकारे निवडून दिली, तेव्हा तेथे जाऊन प्रचार करण्यासाठी भाजपला भरपूर वेळ मिळतो. पंतप्रधान स्वत: मैदानात उतरतात, गृहमंत्रीही स्वत: उतरतात. पण, एवढे करूनही तिथली जनता त्यांना नाकारते.

सौरभ भारद्वार पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशात हे दिसले, गोव्यात आमदार फोडले, अरुणाचल प्रदेशात भाजपने तेच केले. दिल्लीत ऑपरेशन लोटस चालले, पक्ष फोडण्याचा कसा प्रयत्न झाला. शाळांमध्ये मोहीम राबवली गेली, काहीही निष्पन्न झाले नाही. सीबीआयने अबकारी धोरणावर एफआयआर केला होता. काहीही सापडले नाही. तेव्हा तुम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व्हा, असे सांगण्यात आले. दिल्ली सरकार पाडण्याच्या उद्देशाने हे सर्व सुरू आहे.

भाजपचा पलटवार

दुसरीकडे भाजपने या संपूर्ण प्रकरणावर आम आदमी पक्षाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. भाजपचे ईशान्य दिल्लीचे खासदार आणि दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले की, या सर्व गोष्टी मुद्दे वळवण्यासाठी केल्या जात आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here