राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत अडसरे बु येथील करंजवाडी, फळवीरवाडी, भांगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना येथील युवा कार्यकर्ते सागर साबळे यांच्या प्रयत्नांतून ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व अडसरे गावातील आदिवासी लॉयन फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक शाळेला वॉटर फिल्टर देण्यात आले यासोबतच अडसरे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणासाठी 36 उत्तम दर्जाची स्टीलची ताटे देण्यात आली.
दरम्यान अनेक वर्षांपासून या शाळेंना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर ची आवश्यकता होती.यंदाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा उपक्रम राबवत ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आदिवासी लॉयन फौंडेशनच्या सर्व पदाधिकारी,सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी लॉयन फाउंडेशनकडून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.दरम्यान वॉटर फिल्टर व भोजनासाठी स्टीलची ताटे वाटपाच्या वेळी आदिवासी लॉयन फाउंडेशन चे शहानवाज शेख यांचा २८ वा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फळवीरवाडी येथे येथील शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आनंदात केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी आदिवासी लॉयन फाउंडेशन चे युवा कार्यकर्ते
सागर साबळे, प्राणिकेत मुंढे ,रतन भांगरे , शिवाजी तातळे, प्रथमेश मुंढे, दिनकर गोडे, साई गवारी,भरत साबळे, शशिकांत कुंदे ,गोटू तातळे, तुकाराम कुंदे, दशरथ कुंदे, गणेश टिपे, लक्ष्मण साबळे, जालिंदर कातडे आदींसह शिक्षक बोराडे सर, संजय लोहरे सर, आदींसह आदिवासी लॉयन फाउंडेशन चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. लॉयन फाउंडेशन च्या या उपक्रमामुळे निश्चित वॉटर फिल्टर व ताटे शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगात येईल ही अत्यंत गरजेची सुविधा येथील चारही शाळेंना आदिवासी लॉयन फाउंडेशन कडून उपलब्ध करून मिळाली. परिसरातील ग्रामस्थांकडून सागर साबळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केल्या जात आहे.
“वाढदिवस असो अथवा कोणताही आनंदाचा क्षण असो यावेळी नको त्या ठिकाणी होणारा अनाठायी खर्च प्रत्येकाने टाळत आपल्या परिसरातील स्थानिक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटप करणे ही काळाची गरज आहे.आदिवासी लॉयन फाऊंडेशनच्या वतीने ७५ वा अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
– सागर साबळे ,आदिवासी लॉयन फाउंडेशन अडसरे बु.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम