द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कनाशी येथे कै.आण्णासाहेब उर्फ जिभाऊ गुजरे यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
दि.23 सप्टेंबर 2021. श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कनाशी येथे कै.आण्णासाहेब उर्फ जिभाऊ गुजरे यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.राजेश जिभाऊ गुजरे यांच्या संकल्पनेतून आपल्या वडिलांच्या प्रथम स्मृतीदिनी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून आण्णांसाहेबांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य .श्री. एम.व्ही. शिरसाठ सर, पर्यवेक्षक. श्री. डी.जी. भदाणे सर ,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख श्री.आर.एन. निकम सर तसेच माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक अशोक भामरे सर ,श्री.आर.एम.मोरे सर या मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व प्राध्यापक , शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एन.आर.गोसावी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. के.डी. दाभाडे सर यांनी केले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम