द पॉइंट नाऊ : रस्ते अपघातात महाराष्ट्राने मोठा राजकारणी गमावला या अपघातात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची प्राण ज्योत मावळली . विनायक मेटे यांच्या नंतर शिवसंग्राम ची धुरा कुणाच्या हाती हा प्रश्न समोर आला आहे. मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे या सरकारी सेवेत असल्याने त्या राजीनामा देवून राजकारणात सक्रिय होणार का याकडे लक्ष लागून आहे, मात्र राज्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त सदस्यत्व द्यावं, अशी आग्रही मागणी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यानी केली आहे. यामुळे ज्योती मेटे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखतात का हे बघणे महत्वाचे आहे.
नुकतेच अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. मेटें च्या निधनानंतर आज गुरुवारी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये ज्योती मेटेंनी आता शिवसंग्रामची धूरा साभाळावी जेणेकरून कार्यकर्ता एकसंघ असेल अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मेटे यांचा वारसा समर्थपणे पेलण्याचे काम ज्योती मेटे करू शकतात तसेच मेटे यांनी ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष केला, ते काही प्रश्न अजुनही प्रलंबीत आहेत. यापैकी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला ते मिळण्यासाठी शिवसंग्राम संघटनेचा दबावगट असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आरबी समुद्रातील भव्य स्मारक निर्माण करण्यासाठी व साहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्योती मेटे याच पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कार्यकर्ता दुःखात असून त्यांना सावरण्याचे काम ज्योती मेटे यांनी करावे असे देखील कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्योती मेटेनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संघटनेला व पक्षाला समर्थ नेतृत्वाची गरज असल्यामुळे डॉ. ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या नेतृत्वाची धूरा सांभाळून संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे नेतृत्व करतात का हे बघने महत्वाचे आहे.
विनायक मेटे व त्यांची पक्ष संघटना काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून राज्यात वाटचाल करत आहे. वेळोवेळी भाजपला अनेक मार्गाने बळ देण्याचे काम शिवसंग्राम संघटनेने केले आहे . त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषदेच्या जागेवर विनायक मेटे यांना नियुक्ती देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता. परंतु दुर्दैवाने मेटे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे आता तसे होवु शकत नाही. मात्र, मेटे यांच्या जागी त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती विनायक मेटे यांना संधी देण्यात यावी आणि त्यांना विधान परिषद सदस्य म्हणून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नुकतेच मुंबईत झालेल्या मेळाव्यात फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी विनायक मेटेंना सरप्राईज गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले होते. परंतु दुर्दैवी अपघातात मेटेंचे निधन झाल्याने मेटेंना मिळणारी संधी आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना देण्यात यावी. राज्यपाल नियुक्त सदस्यपदी त्यांना घेऊन सरकारमध्ये सहभागी करून घ्यावे, असे शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणने आहे. नेमक ज्योती मेटे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम