मुंबई: शिवसेनेला धक्क्यावर धक्के सुरू असून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला व महाविकासआघाडी सरकार कोसळून ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला.
कोकणातील कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले राजन साळवी मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेचा कोकणातील आणखी हा आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून सुरू झाली असल्याने शिंदे गटात आनंद तर ठाकरे गटात धक्क्याने सावट आहे
राज्यातील भूकंपानंतर मोठी पडझद सेनेत बघायला मिळाली शिवसेनेचे कोकणात सध्या तीन आमदार आहेत. यात वैभव नाईक, भास्कर जाधव व राजन साळवी यांचा समावेश आहे. यापैकी एक आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू zalaynr ठाकरेंचे टेन्शन वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या ते संपर्कात असून राज्याचे सध्या अधिवेशन सुरु असून या दरम्यान प्रवेश होतो की नंतर हे बघणे औत्सुक्याचे असेल.
अधिवेशनादरम्यान, साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला येत्या काही तासात आणखी एक बंडाला सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पूर्णपणे उध्वस्त झालेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असे म्हटले जातेय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम