स्टुडंट ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता ‘कार्तिक’ सत्कार प्रसंगी संभाजी आहेर

0
38
वाखारी ता.देवळा : येथील सुवर्णपदक विजेता कार्तिक भामरे व गौरव पाटील यांचा सत्कार करतांना संभाजी आहेर, रतन पवार, लक्ष्मीकांत पाटील, डॉ.संजय शिरसाठ आदी (छाया - सोमनाथ जगताप)

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : वाखारी ता.देवळा येथील कार्तिक भामरे याने रोहतक (हरियाना) येथे पार पडलेल्या स्टुडनट नशनल ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल आमदार डॉ.राहुल आहेर तसेच वाखारी ग्रामस्थ व देवळा तालुका तालीम संघ यांच्या वतीने मंगळवार (दि.२१) रोजी सत्कार करण्यात आला.

वाखारी ता.देवळा : येथील सुवर्णपदक विजेता कार्तिक भामरे व गौरव पाटील यांचा सत्कार करतांना संभाजी आहेर, रतन पवार, लक्ष्मीकांत पाटील, डॉ.संजय शिरसाठ आदी (छाया – सोमनाथ जगताप)

कार्तिक याने या स्पर्धेत १९ वर्षाखालील ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले असून तो सध्या पुढील स्पर्धांसाठी कोल्हापूर येथील नृसिंह आखाड्यात सराव करत आहे. त्याच्या या यशाप्रित्यर्थ वाखारी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रतन पवार हे होते.

आमदार डॉ.राहुल आहेर, कळवण तालुका तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी कार्तिक भामरे व त्याच्यासोबत उपस्थित असलेला सुवर्णपदक विजेता गौरव पाटील यांचा सन्मान केला. याप्रसंगी युवा नेते संभाजी आहेर, देवळा तालुका तालीम संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन विलास अहिरे, चव्हाण सर यांनी मनोगते व्यक्त केली.

अशोक आहेर, उपसरपंच डॉ.संजय शिरसाठ, नितीन ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ व युवावर्ग उपस्थित होते. दरम्यान दोन्ही पैलवानांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. कार्तिकचे वडील सजन भामरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.डी.बागुल यांनी केले. या कार्यक्रमासाठी रविबाबा चव्हाण, नंदू निकम, दीपक आहेर, पंढरीनाथ जगदाळे, प्रवीण जगदाळे, राकेश ठाकरे, श्याम पवार, बाबूलाल पवार, शिवा जाधव तसेच शिवबा ग्रुपचे सदस्य यांनी संयोजन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here