देवळा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी पत्रकार खंडू मोरे व सचिव पदी संजय पाटील यांची निवड

0
32
देवळा रोटरी क्लबच्या पदग्रहण प्रसंगी पदभार स्वीकारतांना अध्यक्ष खंडू मोरे व एस टी पाटील(छाया - सोमनाथ जगताप )

देवळा; येथील रोटरी क्लब ऑफ देवळा टाउनचा पदग्रहण समारंभ रामरावजी आहेर महाविध्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे , उपप्रांतपाल प्रदीप बच्छाव, नायब तहसीलदार विजय बनसोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

देवळा रोटरी क्लबच्या पदग्रहण प्रसंगी पदभार स्वीकारतांना अध्यक्ष खंडू मोरे व एस टी पाटील(छाया – सोमनाथ जगताप )

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी पत्रकार खंडू मोरे तर सेक्रेटरी संजय पाटील यांनी पदभार स्वीकारला. रोटरॅक्टच्या अध्यक्षपदी निखील पवार व सचिवपदी सौरभ चव्हाण यांनी देखील पदभार स्विकारला. नूतन पदाधिकाऱ्यांना रोटरी कॉलर, चार्टर, हॅमर व पिन देऊन पदभार सोपवला. उपप्रांतपाल प्रदीप बच्छाव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली.

यावेळी देवळा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाचा कार्यभार नुतन अध्यक्ष खंडू मोरे यांनी मावळते अध्यक्ष सुनिल देवरे यांच्याकडून तर नुतन सचिव एस टी पाटील यांनी मावळते सेक्रेटरी खंडू मोरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्याचबरोबर देवळा रोटरॅक्टचे अध्यक्ष निखील पवार ,सचिव सौरभ चव्हाण यांनी जय बच्छाव व मुकुंद बागुल यांच्या हस्ते पदभार स्विकारला.

अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. मावळते अध्यक्ष सुनिल देवरे यांनी गतवर्षाच्या कामगिरीचा आढावा सादर केला. रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष खंडू मोरे यांनी आगामी वर्षाचा संकल्प व संभाव्य उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपप्रांतपाल प्रदीप बच्छाव यांनी प्रांतपाल डॉ.आनंद झुनझुनवाला यांच्या संदेशाचे वाचन केले. देवळा रोटरी क्लबने २२ व्या वर्षात पदार्पण केले असून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबने स्वतःची एक ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्य अतिथी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी सोहळ्याप्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

यावर्षी सुनिल जाधव व अब्रार मणियार या सदस्यांनी रोटरी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नायब तहसीलदार विजय बनसोडे, अरुण पवार ,कृष्णा जाधव, योगेश आहेर, सुनिल आहेर यांचा आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील शालांत परीक्षेत पहिल्या आलेल्या विविध शाळांमधील गुणवंत विध्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ व्ही एम निकम,डॉ वसंत आहेर, कौतिक पवार, सतिश ठाकरे, प्रितेश ठक्कर ,संदीप पगार, अरुण पवार, सुनिल आहेर, अरुन डी पवार, संजीव आहेर, कैलास बागुल, राकेश शिंदे, अब्रार मणियार, सुनील जाधव, स्वामी पवार, रोटरॅक्ट कलबचे सदष्य निखिल पवार, अॅड रितेश निकम, जय बच्छाव, सौरभ चव्हान ,मुकुंद बागुल, मिलिंद मोरे , हर्शल आहेर, स्वप्नील आढाव, दुर्गेश देवरे, तेजस पवार, राज वराडे, परीक्षित आहेर आदिसह बागलाण, कळवण, मालेगाव येथील रोटरी क्लबचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. अरुण पवार व भगवान आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सेक्रेटरी एस टी पाटील यांनी आभार मानले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here