विनायक मेटेंच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

0
27

मुंबई – शिवसंग्रामचे नेते व माजी मंत्री विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. गेल्या १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मेटे यांचा गाडीचा अपघात होऊन मृत्यू झाला होता.

अपघात झाल्यापासून मेटेंच्या पत्नी व नातेवाईकांकडून घातपातीचा संशय व्यक्त केला जात होता. त्यातच आज दुपारी विनायक मेटेंच्या भाच्या आणि पुतण्यांनी पत्रकार परिषद घेऊन मेटेंच्या ड्रायवरवर गंभीर आरोप लावत सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी त्वरित दखल घेत थेट पोलीस महासंचालकांना बोलावत प्रकरण सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विनायक मेटेंचा अपघाती मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिप आणि मेटेंच्या ड्रायवरचे सतत बदलत जाणारे स्टेटमेंट, ३ तारखेला त्यांच्या गाडीमागे केला जाणारा पाठलाग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळेच मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत.

दरम्यान विनायक मेटे यांचा भाचा बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या ड्रायवरवर संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मेटेंच्या ड्रायवर सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तो वारंवार आपला स्टेटमेंट बदलतोय, असा आरोप केला आहे. मेटेंच्या ड्रायवरला लोकेशन विचारताच  तो केवळ रडत होता. शेवटी एकाने फोन आपल्याकडे घेत हा अपघात झाल्याची माहिती दिली, असा आरोप केला आहे.

शिवसंग्रामकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी न झाल्यास शिवसंग्राम पक्षाकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून अपघाताची चौकशी करावी. त्यासोबतच ज्या गाडीने काही दिवसांपूर्वी त्यांचा पाठलाग केला, त्या गाडीचा नंबर देखील समोर आला असून त्याचादेखील शोध पोलिसांनी घ्यायला पाहिजे, अशी मागणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here