देवळा: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातात अकाली एक्झिटने सबंध महाराष्ट्र हळहळला, राज्यभरात त्यांच्या संघर्षातून तयार झालेले कार्यकर्ते सहकारी आज त्यांचे अश्रू थांबवू शकले नाहीत. मेटेंच्या जवळचे अन् विश्वासू सहकारी शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचे संबंध आज पुन्हा अधोरेखित झाले. देवळ्याचे नेतृत्व राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या विनायकरावांच्या किती जवळ होते याचा प्रत्यय आज महाराष्ट्राला आला.

स्व.मेटेंच्या अकाली निधनानंतर एक खाजगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशी संवाद साधत असताना विनायक मेटेंबद्दल जाणून घेत असताना साहेबांचे राजकारण कसे होते, त्यांनी कार्यकर्त्यांना कसे जोडले, त्यांनी माणसे कसे जोडले, मी सरकारी कर्मचारी असल्याने माझी भूमिका काय हे सर्व तुम्ही उदयला विचारा त्याने सर्व जवळून अनुभवले आहे ज्योती मेटेंनी बोलतांना 3 ते 4 वेळेस उदयकुमारांचे नाव घेत एकप्रकारे कौटुंबिक जवळीक अधोरेखित केल्याने, मेटेंच्या निधनाने उदयकुमारांचे अफाट नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
उदयकुमार गेल्या 23 वर्षापासून विनायक मेटे यांच्या सोबत काम करत होते, मेटे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते, त्याचीच परतफेड म्हणुन की काय ओबिसी महामंडळावर संचालक म्हणून देवळा तालुक्यातील पहिला मान उदयकुमार आहेर यांना मिळाला. शिवाजी पार्कवर भाषण करणारे देवळा तालुक्यातील एकमेव नेता म्हणून उदय आहेर यांना मेटेंनी संधी दिली. तसेच प्रत्येकवेळी उदयकुमार यांच्यासाठी पद निर्माण केले गेले विद्यार्थी आघाडी अध्यक्ष, युवक अध्यक्ष दोन वेळा , मधल्या काळात प्रवक्ता व सरचिटणीस असे दोन पदे एकाच वेळा धारण केलेले एकमेव पदाधिकारी म्हणून आहेर यांची ओळख निर्माण झाली.
देवळा शहरासाठी विनायक मेटे यांनी कळत न कळत मदत
450 टपरी धारकांचा अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विनायक मेटे यांची मदत, गॅस एजन्सी, शेतकऱ्यांचे रोख पेमेंट, देवळा शहराला लोहणेर येथून पाणी पुरवठा योजना, अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी साठी मदत अशा अनेक कामांना विनायक मेटेंनी मदत सहकार्य केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम