देवळा ; स्वतंत्र भारताच्या पंच्याहत्तर व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संपूर्ण भारतासह आपल्या देवळा गावातही केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या घर घर तिरंगा या देशभक्तीपर मोहिमेस उदंड प्रतिसाद मिळालेला आहे .
देवळयात सर्वच शासकीय , निमशासकीैय कार्यालये , प्रत्येकाच्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा दिमाखाने फडकताना दिसत आहे .१५ ऑगस्टच्या सूर्यास्तापूर्वी सर्वच राष्ट्रध्वज सन्मानाने उतरविणे बंधनकारक आहे . अशा वेळी अनेक ठिकाणी फाटलेला, उसवलेला व अन्य काही कारणांमुळे खराब झालेल्या राष्ट्रध्वजाची कळत नकळत मोठ्या प्रमाणात हेळसांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या राष्ट्रध्वजाची कुठल्याही प्रकारची हेळसांड होऊ नये , ध्वजाचा सन्मान अबाधित राहावा यासाठी देवळयाच्या अमृतकार पतसंस्थेमार्फत दि .१६ ते १८ ऑगस्टच्या दरम्यान तिरंगा सन्मान अभियान ही संकल्पना राबविण्यात येणार आहे . या अभियानाअंतर्गत फाटलेले, उसवलेले, चुकीचे प्रिंट झालेले किंवा अन्य कारणांमुळे खराब झालेले राष्ट्रध्वज ज्यांच्याकडे असतील त्यांनी पतसंस्था कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावयाचे आहेत .त्याचप्रमाणे देवळा गावात कुठल्याही रस्त्यावर, गल्लीबोळात जर कुठे राष्ट्रध्वज पडलेला, फेकलेला आढळल्यास किंवा आपल्याकडे असल्यास जागृत देशप्रेमी नागरिकांनी नमुद मोबाइल क्रमांकावर कळवावे . संस्थेचे कर्मचारी तेथून सन्मानाने राष्ट्रध्वज संस्था कार्यालयात घेऊन जातील . या मोहिमे अंतर्गत जमा होणारे सर्व राष्ट्रध्वज सन्मानाने देवळ्याचे लोकप्रिय तहसीलदार श्री विजय सूर्यवंशी साहेब यांच्याकडे जमा करण्यात येतील . अमृतकार पतसंस्थेच्या या देशभक्तीपर तिरंगा सन्मान अभियानात जागृत व देशाभिमान असलेल्या नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री भारत कोठावदे यांनी केले आहे.
या अभियानाचे समन्वयक श्री सुनिल (छोटू )आहेर (९९७५९०९८९० ) व्यवस्थापक श्री दावल आहेर (९८९०३४९११४) सागर बच्छाव (७७६७९३३३६४) नंदकुमार खरोटे (९०४९४८७९००) यांच्याशी संपर्क साधावा .
देवळयाच्या अमृतकार पतसंस्थे मार्फत अनोख्या, अनुकरणीय व देशभक्तीने प्रेरित असलेल्या तिरंगा सन्मान अभियानाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. नागरिकांनी या अभियानास प्रतिसाद देऊन राष्ट्रध्वजाचा मान सन्मान व अभिमान वाढवावा. विजय सूर्यवंशी -तहसीलदार देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम