देवळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन; महिला पोलिसांनी राबवला उपक्रम

0
48
येथील पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास उपस्थित पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे आदींसह कर्मचारी आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; पोलीस खात्यातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही सण ,उत्सवाला सुट्टी माहीत नसते .रक्षाबंधन तसेच भाऊबीज म्हणजे भावा बहिणीचे अतूट बंधन मात्र या बंधनापासून पोलीस खात्यातील पदाधिकारी व कर्मचारी दूर झाल्याची खंत व्यक्त या विभागातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

येथील पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास उपस्थित पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे आदींसह कर्मचारी आदी (छाया – सोमनाथ जगताप )

आज देवळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला .यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक सह इतर कर्मचाऱ्यांना हेच आपले रक्षक व हेच आपले भाऊ असून त्यांना राख्या बांधून देवळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरे करण्यात आले . अनेक पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सण उत्सवासाठी इच्छा असतांना देखील घरी जाता येत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली .

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे ,पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, विक्रांत कचरे , श्रावण शिंदे, हवालदार रामदास गवळी, पोलिस नाईक भास्कर सोनवणे, रुतीका कुमावत , महीला पोलीस नाईक ज्योती गोसावी, महीला काॅनस्टेबल माधुरी पवार, स्वाती चव्हाण, सफाई कामगार दिपक गोयेकर आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here