कुंभार्डे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

0
26

योगेश ठाकरे
कुंभार्डे : तालुक्यातील कुंभार्डे येथे क्रांतीकारी खाज्या नाईक संघटना महाराष्ट्रात राज्य यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष एकलव्य संघटनेचे श्री प्रल्हाद संजय सोनवणे हे होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत प्रमुख पाहुण्यांनी आदिवासी दिन विषयी माहिती दिली. आदिवासी बांधवांनी 9 ऑगस्ट हा दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहुन जल्लोषात साजरा केला पाहिजे. तसेच शालेय शिक्षण घेतले पाहिजे, आपल्या समाजातील सण, उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले पाहिजे असा संदेश दिला. विशेष म्हणजे गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन एकोपा दर्शवला. यावेळी अंजली केदारे, समाधान ठाकरे, श्रावण जाधव, प्रकाश सोनवणे, साईनाथ केदारे, अजय पिंपळसे, शिवाजी सोनवणे, गणेश महाले, हिरामण वाघ, शांताराम जाधव, सतिश सोनवणे, अनिल सोनवणे, मोठाभाऊ धोंडगे, कृष्णा पिंपळसे, म्हसू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here