अन् अखेर महाराष्ट्राला मंत्री मिळाले; राठोडही झाले पवित्र

0
46

महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ विस्तार होत असून यामध्ये 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रत्येकी नऊ मंत्र्यांचा समावेश आहे. यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 20 पर्यंत वाढेल, जी कमाल 43 सदस्यांच्या निम्म्याहून कमी आहे.

महाराष्ट्राला 18 नवे मंत्री
राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा सुरू असून, महाराष्ट्राला 18 नवीन मंत्री मिळाले आहेत. त्यासाठी राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा सुरू आहे, भाजपच्या 9 जणांची यादी तयार करण्यात आली होती त्यानुसार शपथ घेण्यात आली, दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत शिंदे गटाची यादी निश्चित करण्यात आली. ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सामील होणार आहेत.

पूजा चव्हाण आत्म्हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. भाजपा नेत्या चित्रा वाघ आता काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे आहे.

महाराष्ट्राला मिळाले 18 नवे मंत्री
शिंदे गटाचे मंत्री
तानाजी सावंत
उदय सामंत
संदिपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील

भाजपचे मंत्री

गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here