
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; जि प सदस्या डॉ.नूतन आहेर यांनी वाखारी गटातील अतिदुर्गम अशा दत्तक घेतलेल्या कांचने गावात विविध विकास कामे पूर्ण केल्याने स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले .
मंगळवारी( दि २१) रोजी कांचने गावात विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील(गोटुआबा) आहेर उपस्थित होते. यात प्रामुख्याने सिमेंट बंधारा, जि. प. शाळा व उपकेंद्र इमारत दुरुस्ती, पाणीपुरवठा, कांचने किल्ल्याचे पाणी कनकापूर (वडाळे) पाझर तलावात वळविणे, विविध ठिकाणी सौर पथदीप, भूमिगत गटार, समाज मंदिर व स्मशानभूमी संरक्षक भिंत इत्यादी कामांचा समावेश आहे . सदर कार्यक्रमाप्रसंगी येथील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी व युवक मित्र मंडळाच्या वतीने डॉ.नूतन आहेर यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी सरपंच श्रावण आप्पा, उपसरपंच ॲड तुषार शिंदे, चेअरमन नामदेव शिंदे, महारु शिंदे , श्रीराम शिंदे, लखा शिंदे, कौतिक शिंदे, अशोक शिंदे, माणिक शिंदे, गोविंद बर्वे, संतोष शिंदे, भास्कर शिंदे, सतीश शिंदे, कैलास महाले, नामदेव हेंबाडे, जिभाऊ हेंबाडे, बापू आघाव, कारभारी बाबा, शिवाजी पवार, श्रावण पवार, निवृत्ती शिंदे, संजय जैन, नितीन शिंदे, योगेश शिंदे, सोनू शिंदे, बबन शिंदे, दादाजी बर्वे, देवराम पवार, सुरेखा शिंदे, ग्राम विस्तार अधिकारी जयश्री आहेर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम