अन् आ. डॉ राहुल अखेर बोलले…..!

0
36

देवळा: मालेगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नाशिक विभागीय आढावा बैठकीत आपल्या भाषणात चांदवड – देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी मालेगाव जिल्हानिर्मितीला आमचा विरोध नाही.मात्र चांदवड व देवळा तालुक्यातील जनेतीची भावना आहे की चांदवड व देवळा तालुका हा नाशिक जिल्ह्यातच राहावे परंतु प्रशासनाने आराखडा बनवत असतांना कुठल्याही लोकप्रतिनींधीसोबत आजपर्यंत लेखी अथवा तोंडी चर्चा केलेली नाही.

त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरीही जनतेच्या भावना लक्षात घेवून चांदवड व देवळा तालुका हा नाशिक जिल्हयामध्येच राहावा अशी सर्वांची मागणी आहे असा मुद्दा उपस्थित केला.

तर आ.डॉ.राहुल आहेर यांनी उपस्थितीत केलेल्या मुद्दावर बोलतांना मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले की जनभावना लक्षात घेऊनच जिल्हा निर्मितीचा आराखडा होईल तसेच सर्वांना विश्वासात घेतल्या शिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here