“तुम्ही मराठी बोलायचा आग्रह धरा”, सचिन खेडेकरांचे मराठी माणसांना आवाहन

0
23

मुंबई – प्रसिध्द मराठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांना मराठी भाषेचा आग्रह धरावा, असे आवाहन केले आहे. तसा एक व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे.

सचिन खेडेकर हे मराठी कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन करत आहे. त्यांच्या एका एपिसोडमध्ये प्रेक्षकांशी बोलताना त्यांनी मराठीचा मुद्दा पकडत मार्केटिंग कंपनीशी बोलताना मराठीत बोलले पाहिजे, असे आवाहन केले. कारण मराठीत बोलल्यामुळे आपल्या मराठी माणसांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकर्यांनी त्यांचे कौतुक केले.

काय म्हणता यात सचिन खेडेकर ?

प्रस्तुत व्हिडीओमध्ये ते असे म्हणतात, की “तुम्हाला जेव्हा कॉल सेंटरला फोन लावायचा असतो तेव्हा इंग्रजी, हिंदी आणि मराठी असे तीन भाषांचे पर्याय असतात, त्यात तुम्ही मराठी निवडता. तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता, तिथेही मराठी, हिंदी, इंग्रजी असे पर्याय असतात. त्यावेळीही तुम्ही मराठी भाषेचा पर्याय निवडता. पण जेव्हा तुम्हाला मार्केटींगवाल्यांचा फोन येतो आणि समोरचा तुमच्याशी हिंदी किंवा इंग्रजीतून बोलायला लागतो, तेव्हा मराठी बोलायचा आग्रह धरला पाहिजे. कारण हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही तर हा हजारो लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. कारण आपण मराठीचा आग्रह धरल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल, व्यवसाय मिळेल. आपण एक पाऊल पुढे टाकू या, मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल !”


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here