
देवळा ; (सोमनाथ जगताप )देवळा तालुक्यातील माहे जानेवारी २०२१ ते डिसेबर -२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकिसाठी ४६ प्रभागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण ३१० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत पुढीलप्रमाणे – कंसात दाखल अर्ज विजयनगर (११), पिंपळगाव(३४), खुंटेवाडी,(२६) वाखारी(२२), शेरी,(१४) रामेश्वर,(१५) सुभाषनगर(१२), सावकी(३६), खर्डे(४९), वार्षी(१७), खडकतळे,(१८) गुंजाळनगर(३३), कापशी(२३) याप्रमाणे ,दरम्यान , आज अंतिम दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आला होता . दाखल नामनिर्देशनपत्राची उद्या बुधवार (दिनांक २०) रोजी छाननी करण्यात येणार आहे तर शुक्रवार (दिनांक २२) रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत माघारीची मदूत आहे . मतदान (दिनांक ०४) रोजी होणार आहे . येन पावसाळ्यात निवडणूकची रणधुमाळी पहावयास मिळणार असून, खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम