– सोमनाथ जगताप
देवळा: तालुक्यातील माहे जानेवारी २०२१ ते डिसेबर -२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकिसाठी ४६ प्रभागांसाठी आज अखेर एकूण ११० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या दि १९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे.
देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत पुढीलप्रमाणे –
कंसात दाखल अर्ज विजयनगर (९), पिंपळगाव(१३), खुंटेवाडी, (०) वाखारी(१३), शेरी, (०) रामेश्वर,(४) सुभाषनगर(१), सावकी(१०), खर्डे(३५), वार्षी(०), खडकतळे, (५) गुंजाळनगर(१४), कापशी(६) याप्रमाणे ,दरम्यान , आज तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह समर्थकांनी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते.
उद्या मंगळवारी(दि१९) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने यात आणखी भर पडणार आहे . यामुळे सर्वच ठिकाणी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत असून, नामनिर्देशनपत्राची
(दिनांक २०) रोजी छाननी करण्यात येणार आहे तर
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची (दिनांक २२) रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत मदूत आहे. तर मतदान (दिनांक ०४) रोजी होणार आहे. येन पावसाळ्यात निवडणूकची रणधुमाळी पहावयास मिळणार असून, खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम