आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या नवे दर

0
13

नाशिक – काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केल्यामुळे आजपासून पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून नवीन दरानुसार इंधन विक्री केली जाणार आहे, त्यानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोल १०६ ₹ प्रतिलिटर तर डिझेल ९५ ₹ प्रतिलिटर इतके असणार आहे. मात्र शहरानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर राहणार आहे.

आजचे पेट्रोल व डिझेलचे सुधारित दर (किंमत प्रतिलिटर)

पेट्रोल
मुंबई – ₹१०६.३५
पुणे – ₹१०६.७५
नाशिक – ₹१०६.७८
औरंगाबाद – ₹१०८.००
नागपूर – ₹१०६.०६

डिझेल
मुंबई – ₹९४.२७
पुणे – ₹९३.२०
नाशिक – ₹९३.२४
औरंगाबाद – ₹९५.९२
नागपूर – ₹९५.५७

सरकारवर ६ हजार कोटींचा बोजा

“पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सरकारवर ६ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मात्र, हा महसूल गेला तरी विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल.” – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

केंद्र सरकारने मे महिन्यात उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल व डिझेल दरात मोठी घट झाली होती. त्याच्या दोन दिवसांनी तत्कालीन राज्य सरकारनेही व्हॅट कमी केल्याचे सांगितले होते; पण त्याचा परिणाम दरांवर दिसला नाही. त्यामुळे २२ मेपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर होते. त्यावेळी राज्य सरकार पेट्रोलवर ३०.८२ ₹, तर डिझेलवर २१.२६ ₹ प्रतिलिटर व्हॅट आकारत होते. हा व्हॅट आता अनुक्रमे २५.८२ ₹ व १८.२६ ₹ होईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here