गायत्री शेलार
नासाने जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बिणी मानल्या जाणाऱ्या ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ ने ब्रम्हांडचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ह्या दुर्बिणीच्या साहाय्याने काढलेल्या आकाशगंगेच्या काही फोटोज् प्रसिद्ध केली आहेत. असे म्हटले जाते, की हे आतापर्यंत पाहिलेले विश्वाचे सर्वात खोल आणि ठळक दृश्य आहेत. नासाचे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले, चित्रात दिसणारा किमान एक दिवा १३ अब्ज वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजेच बिग बँगच्या ८०० दशलक्ष वर्षांनंतरचा आहे.
नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाहिलेल्या विश्वाचा सर्वोच्च रिझोल्यूशनचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला. नासा म्हणते की अशा आकाशगंगा दर्शविणारे हे विश्वातील सर्वात दूरचे, सर्वात तपशीलवार चित्र आहे. त्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी अब्जावधी वर्षे लागतात.
जेम्स वेब टेलिस्कोप ही आतापर्यंतची अंतराळात पाठवलेली सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली दुर्बीण आहे. ही दुर्बिण बनवण्यासाठी तब्बल ९ बिलियन डॉलर इतका खर्च आला. आकाशगंगेच्या बाहेर पसरलेल्या अनंत विश्वात डोकावण्याच्या उद्देशाने ही दुर्बीण तयार करण्यात आली आहे. जेम्स वेब टेलीस्कोप नॉर्थरोब ग्रुमन कॉर्प या एरोस्पेस उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने तयार केले आहे.
प्रकाशाचा प्रत्येक बिंदू हा हजारो आकाशगंगांचा आहे
ते असेही म्हणाले, की महाविस्फोटाच्या १३.८ अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची सुरुवात झाल्याचे मानले जाते. जेम्स वेबने घेतलेल्या चित्रांमध्ये दिसणारा प्रत्येक प्रकाश बिंदू हा हजारो आकाशगंगांचा समूह आहे आणि हाताच्या अंतरावरुन तांदळाच्या दाण्याकडे पाहण्यासारखा आहे.

सदर्न रिंग (Southern Ring) हा वायू आणि धुळीचा एक महाकाय गोळा आहे, जो सतत मोठा होतोय. सदर्न रिंग या गोळ्याचा व्यास साधारण अर्धा प्रकाशवर्ष आहे आणि तो पृथ्वीपासून सुमारे दोन हजार प्रकाशवर्ष दूर आहे. त्याच्या मध्यभागी एक नष्ट होत चाललेला तारा आहे, ज्यामुळे हा गोळा प्रकाशमान झालेला आहे. याला “Eight burst” नेब्युला सुद्धा म्हटलं जातं.

करिना नेब्युला (तेजोमेघ) हा मुळात हबल दुर्बिणीच्या सर्वांत पहिल्या लक्ष्यांपैकी एक होता. एक नेब्युला म्हणजे तारे आणि धुळीच्या मिश्रणातून बनलेलं एक ढगाळ भाग, ज्यामुळे काळ्याकुट्ट आकाशात एक मोठा प्रकाशमान झालेला भाग दिसतो.आता जेम्स वेबने त्याच भागाचा अत्यंत स्पष्ट फोटो टिपलाय. हा नेब्युला पृथ्वीपासून साधारण ७,६०० प्रकाशवर्ष दूर आहे. पण या फोटोत आपल्याला काही विशेष तारे नाही दिसत तर दिसतात ते नुसते ढग आणि त्यांच्या भवतालचा वायू.

वेबचे पहिले डीप फील्ड हे आकाशगंगा क्लस्टर SMACS 0723 आहे, आणि ते हजारो आकाशगंगांनी भरलेले आहे – इन्फ्रारेडमध्ये पाहिलेल्या सर्वात अस्पष्ट वस्तूंसह. वेबची ही प्रतिमा अंदाजे हाताच्या लांबीवर धरलेल्या वाळूच्या दाण्याएवढी आहे, या प्रतिमेत टिपलेला हा विशाल विश्वाचा एक छोटासा आहे.

स्टीफन ट्वेंटी नावाच्या या पाच पाच आकाशगंगा समूहाचे यापूर्वी कधीही न पाहिलेले तपशील उघड केले आहेत. नासाने सांगितले की, ही प्रतिमा दुर्मिळ ज्वलंत तपशिलात दर्शवते की आकाशगंगा एकमेकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती कशी सुरू करतात आणि आकाशगंगांमधील वायू कशा प्रकारे विचलित होत आहेत हे ह्या प्रतिमेतून दिसते.
नासाच्या वेबसाइटनुसार, आकाशगंगा समूह प्रतिमा ही वेब टेलिस्कोपची आजपर्यंतची सर्वात मोठी प्रतिमा आहे जी चंद्राच्या व्यासाच्या सुमारे एक पंचमांश व्यापते.
सर्वात शक्तिशाली जेम्स वेब
जेम्स वेब दुर्बिणीने ३० वर्षीय हबल टेलिस्कोपची जागा घेतली आहे आणि ती त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा जवळपास १०० पट अधिक शक्तिशाली आहे. त्याची प्रकाश शोषण्याची क्षमता जास्त विस्तृत आहे. त्यामुळे त्याने दूरवरच्या गोष्टीही पाहता येतात. वेबने सुरुवातीला छायाचित्रे काढलेली पाच ठिकाणे शास्त्रज्ञांना आधीच माहिती होती. यापैकी दोन वायूचे महाकाय ढग आहेत जे नवीन ताऱ्यांच्या निर्मितीदरम्यान स्फोटांमुळे तयार झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम