प्रहारच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी अंतू पवार

0
25

देवळा ; प्रहार जनशक्ती पक्षाच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी खर्डे ता देवळा येथील युवा शेतकरी शशिकांत उर्फ अंतू पवार यांची नियुक्ती करण्यात आली . देवळा तालुक्यात नुकत्याच झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या हस्ते शशिकांत पवार यांना तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी   प्रहारचे बापू देवरे ,रवी चव्हाण, रामदास पवार, शरद देवरे, गिरीश पवार ,अमोल देवरे ,प्रवीण देवरे,  कैलास पगार ,संदीप पुंजाराम पवार आदी उपस्थित होते .

त्यांच्या निवडीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके , जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर , जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, कैलास पगार आदींनी अभिनंदन केले आहे . पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार सर्वाना सोबत घेऊन पक्ष बळकटीकरण  व सर्वसामान्य शेतकरी , कष्टकरी आदींच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काम करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष शशिकांत पवार यांनी यावेळी सांगितले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here