देवळा ; तालुक्यातील भऊर येथिल महाराष्ट्र बँकेत बँक कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या खात्यातील जादा पैसे हडप केलल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे भऊर व परिसरात ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे या बँकेतील कर्मचाऱ्यांने ग्राहकांच्या फिक्स डिपाँजीट मधील पैसे सुद्धा परस्पर हडप करण्याचे धाडस दाखवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल देवळा पोलिसांनी घेतली असून पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे स्वतः महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत मंगळवारी(१२) रोजी दुपार पासून तळ ठोकून सखोल माहिती घेत आहेत.
या घटनेनंतर ग्राहकांनी आपले पैसे सुरक्षित आहेत की नाही यासाठी बँकेत एकच गर्दी केली. संबंधित कर्मचाऱ्याने एकूण किती रकमेचा अपहार केला याचा हिशेब लावण्याचे काम सुरु असले तरी ही रक्कम काही कोटींच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या अपहराची वाच्यता होताच बँकेचा संशयित कर्मचारी मात्र पसार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या बाबत समजलेली हकिकत अशी कि ,देवळा तालुक्यातील भऊर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असुन परिसरातील अनेक शेतकरी बांधवांचे बचत खाते आहेत. सदरचा परिसर हा सदन असुन त्या मुळे बँकेची उलाढाल ही रोज मोठ्या प्रमाणात होत असते. शेतकरी वर्गाच्या अडीअ डचणीचा फायदा घेत येथिल एका कर्मचाऱ्याने चक्क खात्यातील पैशावर खातेदाराची दिशाभूल करून डल्ला मारला आहे. केवळ बचत खातेच नाही तर शेतकरी खातेदारांच्या फिक्स डिपाँजीट मधील पैसेही परस्पर काढण्याचा भिम पराक्रम या महाभागाने केला आहे.दरम्यान, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे हे घटना स्थळी दाखल झाले असून,रात्री उशिरा पर्यंत याकामी गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, बँकेतील या प्रक्रियेत आणखी कोण कोण सहभागी आहेत त्याचाही सखोल तपास केला जाईल व आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक लांडगे यांनी दिली .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम