कळवण: चाचेर येथील पांढरी पाढाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकेदायक पोल वाकल्याने गेल्या महिन्यापासून विद्युत तारा रस्त्याच्या खाली आल्यामुळे खालून जाणारा डांबरी रोड हा पांढरी पाढाकडे जातो त्यामुळे त्या रस्त्यावर शाळेच्या स्कूलबसही तिथूनच वापस जात आहेत, त्यामुळे ह्या लहान विद्यार्थ्यांना पावसातच भिजत शाळेत जावे लागत असून येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व सामान्य वाहन व लोकांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. याची पूर्वक कल्पना देऊन सुद्धा कनिष्ठ अभियंता व संबंधित वायरमन लोकांच्या जीवांची पर्वा करत नसून तिथे जागेवर पाहणी करण्यास सुद्धा नकार देत आहे अशा बेफिकीर कनिष्ठ अभियंता व वायरमन यांना महिन्यापासून निवेदन देऊन सुद्धा कुठलीच कारवाई न केल्याने अशा कनिष्ठ अभियंता वायरमन यांना त्वरित निलंबित करा असे माजी सैनिक आहेर यांनी सांगितले आहे.
काही दिवसापूर्वी सदर घटना आमच्या प्रतिनिधींना समजली असताना आमच्या प्रतिनिधींनी कनिष्ठ अभियंता वाघ यांच्याशी संपर्क केला व घटनेचे गांभीर्य समजून सांगितले मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले असून कॉन्ट्रॅक्टर मिळत नसल्याचे असभ्य उत्तर मीडिया प्रतिनिधीला दिले आहे, अशा मुजोर अधिकाऱ्यांना कुणाचा वचक नसल्याचे यातून निदर्शनात आले आहे
वाघ यांनी माजी सैनिकांचा अपमास्पद शब्दात अपमान केला होता त्याची वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांनी त्या रागाच्या भरात हे काम करायचे नाही म्हणून तो खांब व तारा स्थलांतरित केल्या नसून हा राग लहान विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक व आदिवासी बांधव यांच्या अंगलट येऊ शकतो असे देखील माजी सैनिक आहेर यांनी म्हटले आहे.
आहेर पुढे म्हणाले माजी सैनिकांचा अपमानास्पद वागणूक, हेवेदावे बाजूला ठेवून सर्वसामान्य लहान विद्यार्थी आदिवासी बांधव यांच्या जीवाशी न खेळता त्वरित विद्युत पोल व तारा तात्पुरत्या खोलून येणारा जाणारा रस्ता मोकळा करावा. जेणेकरून होणारी जीवितहानी टाळता येईल.तरी कनिष्ठ अभियंता व संबंधित वायरमन यांनी माजी सैनिक यांचा केलेला अपमान व लहान विद्यार्थी व सर्व सामान्य आदिवासी बांधव यांच्या जीवाशी खेळलेला खेळ याचा जाब विचारण्यासाठी येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे आमरण उपोषण करणार आहोत, या निर्णयावर पण ठाम आहोत तसे निवेदन वरिष्ठ अधिकारी यांना दिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम