मुंबई – अभिनेता रितेश देशमुख हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. कारण त्याचा आगामी मराठी चित्रपट ‘वेड’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तशी माहिती त्याने सोशल मीडियातून दिली.
रितेश त्याच्या पोस्टमध्ये म्हणतोय की, मला अतिशय आनंद होतोय की आज मी दिग्दर्शित करणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाला आहे. अनेक अडचणींवर मात देत चित्रपटाचा पहिला टप्पा पार पडला. ह्यात सलमान खानने जिवाभावाची साथ दिली, जशी माझ्या पहिल्या मराठी चित्रपट ‘लईभारी’ मध्ये दिली तशी.
ह्या चित्रपटात कोण कोण असणार आहे, हे सांगितले नसले तरी ह्या फोटोतून हे स्पष्ट झाले की, सलमान खान ह्यात पाहुण्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम