द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील दिगग्ज नेत्यांच्या दिवसभरात पत्रकार परिषद होणार आहेत.
किरीट सोमय्या 9.00 वा.
हसन मुश्रीफ 11.00 वा.
चंद्रकांत पाटील 11.30 वा.
हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर कालपासून राजकीय वातावरण तापले आहे. कोल्हापूरला जाण्यापासून सोमय्या यांना कराड येथे रोखले आहे. यामुळे सोमय्या कराड मध्ये पत्रकार परिषदेत काय उघड करता याकडे सर्व्यांचे लक्ष लागून आहे.
हसन मुश्रीफ देखील पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावणार आहेत. त्यांनी गेल्यावेळी देखील सोमय्या यांना सडेतोड उत्तर दिले होते. यावेळी देखील मुश्रीफ आक्रमक होऊन काय भूमिका जाहीर करता याकडे लक्ष लागून आहे.
भाजपा प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. पाटील देखील कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने आज त्याच्या परिषदेला देखील विशेष महत्त्व आहे. भाजपा आक्रमक होऊन आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आज पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम