देवळा ; पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून, त्या दैवतचा व वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढि एकादशी, हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानण्यात येतो.

या दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी. व व्ही.के.डी.विद्यालयात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजल्यापासून विद्यालयाच्या परिसरात विठ्ठलाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण तयार झाले होते. विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पोषाख परिधान केला होता. डोक्यावर टोपी, अंगात सदरा, धोतर, हातात टाळ, वीणा, कपाळी टिळा व चिमुकल्याच्या तोंडातून निघणारा विठूमाऊलीचा जयघोष, सोबत विठ्ठलाची सजवलेली पालखी जणू विद्यार्थी पंढरीच्या वारीला जात असल्याचे भासत होते.
विद्यालयाचे विद्यार्थी स्वरूप ठोबरे व शिवम पवार यांनी सावळ्या विठ्ठलाचा अवतार धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी रिंगण तयार करून, विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाची पूजा करून,आरती गायली गेली. रिंगणात विद्यालयाच्या शिक्षिका व विद्यार्थिनींनी फुगडी खेळून कार्यक्रमाचा आनंद लुटला. विद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पाटील , एन .के. वाघ यांनी विठ्ठलाच्या पालखीचे पूजन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा जाधव,रत्नमाला सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माया गिरी,उर्मिला सूर्यवंशी,प्रियंका खैरनार, अर्चना महाजन, रतन भोईर,राहुल अहिरराव यांनी सहकार्य केले. संस्थेचे चेअरमन संजय देवरे सचिव मीना देवरे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम