नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वादग्रस्त चित्रफीत केल्याप्रकरणी झी न्यूज वाहिनीचे वृत्तनिवेदक रोहित रंजन यांना अटक न करण्याचे निर्देश देत सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. रोहित रंजन यांच्याविरोधात कोणतीही बळाची कारवाई करू नये व त्यांना ताब्यातही घेऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
छत्तीसगड पोलिसांचे पथक मंगळवारी रंजन यांना अटक करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद शहरात त्यांच्या घरी गेले, पण त्याचवेळी नोएडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्याच दिवशी रात्री त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
राहुल यांच्याबाबतची वादग्रस्त चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंजन यांनी हे चुकीने घडल्याचे सांगून माफी मागितली होती. राहुल यांची विधाने संदर्भ सोडून उदयपूर हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे भासविण्यात आले होते. वास्तविक ही विधाने राहुल यांच्या वायनाड कार्यालयावर हल्ला करणाऱ्या एफएसआयच्या कार्यकर्त्यांना उद्देशून होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम