मुंबई – शेअर मार्केटमधून अरबोंची कमाई करणाऱ्यांमध्ये राकेश झुनझुनवाला यांचे नाव अग्रस्थानी येते. त्यांच्या शेअरमार्केटतील टिप्समुळे अनेक जण लखपती झाले. त्यामुळेच तर त्यांना भारतीय शेअरमार्केटचा बिग बुल म्हणून ओळखले जातात. त्यांना दिलेली ही उपाधी त्यांनी पुन्हा एकदा योग्य असल्याची सिद्ध केली. गुरुवारी त्यांच्या दोन शेअर्समध्ये त्यांनी जी रक्कम लावली होती, त्या शेअर्सने झुनझुनवाला यांना थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल एकाच दिवशी तब्बल १०६१ कोटींची कमाई करून दिली.
झुनझुनवालांचे हे दोन स्टॉक्स बनले मालामाल
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये सर्वात जास्त मूल्य असलेल्या टायटन आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स या दोन स्टॉक्समध्ये त्यांनी जास्त रक्कम गुंतवलेली होती. कालच्या शेअर मार्केटच्या व्यापारी सत्रात या दोन्ही शेअर्सने कमाल केली. त्यांच्यामध्ये कमालीची तेजी पहायला मिळाली. टाटा समुहाची कंपनी असलेली टायटनच्या शेअरमध्ये जवळपास ८० टक्क्यांची तर स्टार हेल्थच्या शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी दिसून आली. या शेअर्सने एकाच दिवशी झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एक हजार कोटींची भर घातली.
बीएसई निर्देशांकावर गुरुवारी टायटनचा शेअर ११४.६० रुपयांनी वाढून २,१२८ रुपयांवर बंद झाला. व्यापारी सत्रात हा शेअर एकावेळी तर २,१७०.९५ रुपयांवर होता. त्यामुळे त्याची इंट्राडे ची एका दिवसातील उलाढाल ७.८ टक्क्यांवर पोहचली. तर स्टार हेल्थचा शेअर बीएसईवर ५४.२५ रुपयांनी वाढून ५३०.२० रुपयांवर बंद झाला.
झुनझुनवाला यांचे असलेले एकूण शेअर्स
झुनझुनवाला कुटुंबियांकडे टायटन समुहाची ४,४८,५०,९७० शेअर्स आहे तर स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये राकेश झुनझुनवाला यांचे ८,२८,८२,९५८ शेअर्स तर त्यांच्या पत्नीकडे १,७८,७०,९७७ इतके शेअर्स आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम