विठे्वाडी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी कापडणीस तर स्विकृत पदी शेळके यांची नियुक्ती

0
34

देवळा ; तालुक्यातील विठे्वाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालक पदी तकदीर कापडणीस तर स्विकृत सदस्य पदी भिका शेळके यांची नियुक्ती करण्यात आली .या संस्थेच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अंत्यत चुरशीच्या निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभूत झालेले उमेदवार तकदीर कापडणीस यांची संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने तज्ञ संचालक म्हणून तसेच स्विकृत सदस्य म्हणून भिकाजी शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी त्यांना सेवा सहकारी संस्थेच्या वतीने नियुक्ती पत्र देताना संस्थेचे चेअरमन प्रशांत निकम, व्हा चेअरमन समाधान निकम आदींसह संचालक कुबेर जाधव , अभिजित निकम , महेंद्र आहेर, बाळासाहेब सोनवणे, कैलास कोकरे, जिजाऊ बोरसे, पंडित निकम, संचालीका सुनंदा निकम, सुनिता निकम , सचिव संजय निकम आदी मान्यवर उपस्थित होते , त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here