देवळा ; तालुक्यातील कणकापूर येथील राजमाता जिजाऊ बहुऊद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने पाणी वापर संस्था व युवा मित्र संस्था सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने मनीषा पोटे, डांगे , सागर गुंड यांच्या माध्यमातून कनकापूर येथे गेल्या 2 वर्षा पासून चालू असलेल्या जल समृद्धीतुन विकास या प्रकल्पा अंतर्गत धरण खोलीकरणा नंतर विकास सोसायटीचे व्हा.चेअरमन, पाणी वापर संस्थेचे उपाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते युवा शेतकरी नितीन शिंदे यांच्या शेततळ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष जगदीश शिंदे, सुरेश बाबा शिंदे, बाळू अहिरे, खंडू पवार, गणेश शिंदे, योगेश शिंदे, राकेश शिंदे, भाऊसाहेब शिंदे, बंडू शिंदे, सुनील अहिरे, अनिल अहिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याकामी लाभार्थी शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी डिझेल स्वतः टाकायचे आहे व ताशी 350रू. मेंटेनन्स म्हणून देय आहे. कनकापूर व परिसरातील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम