लंडन – बोरिस जॉन्सन हे आज ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करतील, असे वृत्त बीबीसीने दिले आहे. नवनियुक्त मंत्री व ५० हून अधिक जणांनी बंडखोरी करत जॉन्सन सरकारमधून बाहेर पडले आहेत, यामुळे जॉन्सन एकाकी पडले आहेत.
गेल्या दोन तासांत ब्रिटनमधील आठ मंत्र्यांनी राजीनामा दिले आहेत. यामुळे एकाकी पडलेले जॉन्सन पंतप्रधानपदावरुन पायउतार होत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. ‘बोरिस जॉन्सन आज काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून राजीनामा देतील,’ असे बीबीसीने वृत्तात नमूद केले आहे.
जॉन्सन यांच्या काँझर्व्हेटिव्ह पक्षात बंडखोरी झाली आहे. आतापर्यंत ४१ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला. विरोधी लेबर पक्षानेदेखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये जॉन्सन यांनी ख्रिस पिंचर यांची पक्षाच्या डेप्युटी चीफ व्हीप म्हणून नियुक्ती केली होती. ह्याच कारणामुळे जॉन्सनविरोधात बंडखोरी सुरु झाली. ३० जून रोजीच्या ‘द सन’च्या वृत्तानुसार, पिंचर यांनी लंडनमधील एका क्लबमध्ये दोन युवकांना आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला होता. या वृत्तानंतर पिंचर यांनी डेप्युटी चीफ व्हीप पदाचा राजीनामा दिला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम