तालिबानचे चांगुलपणाचे थोतांड; मुलींचे शरीर दिसते म्हणून खेळण्यावर बंदी

0
44

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; अफगाणिस्तान (Afghanistan) मधील परिस्थिती आज संपूर्ण जगाला परिचित आहे. तालिबान (Taliban) या दहशतवादी (Terrorist) संघटनेने इथला ताबा मिळवल्यापासून इथले अतोनात नुकसान झाले आहे. आता इथे तब्बल महिनाभरा नंतर शाळा (School) सुरू झाल्या आहेत.

मात्र त्या केवळ मुलांसाठी. विद्यार्थिनी (Girls) आणि शिक्षिका यांसाठी शिक्षणाची कवाडे तालिबान ने बंदच ठेवली आहेत. मुलींसाठी शिक्षणाबाबत (Education) अजून निर्णय झाला नसल्याचं तालिबान ने सांगितल्याचं बोललं जातंय.
तालिबान ने सत्ता स्थापन केल्यापासून आपले भयावह रंग सदोदित दाखवले आहेत.

मुलींचे शरीर दिसून येते, म्हणून तालिबान ने महिला खेळाडूंच्या खेळण्यावर बंदी घातली. त्यामुळे संपूर्ण जगभरातून टीका झाली. आणि त्यात तालिबान ने मुलींच्या शिक्षणावर देखील अद्याप बंदी घातल्याने इथल्या महिलांचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे.

तालिबान ने मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत, सर्व पुरुष शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महिलांबाबत शिक्षणाचा निर्णय घेतला न गेल्याने त्यांचे भवितव्य मात्र पूर्णतः काळवंडलेले दिसत आहे.

तालिबान चा महिलांबाबत खूप कडक कायदा आहे. ज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात बंधने घातली गेली आहेत. त्यामुळे इथल्या महिला मोठ्या धास्ती मध्ये जगत आहेत.

महिला वर्गाला जुन्या काळापासून म्हणावे तसे स्वातंत्र्य नव्हते. मात्र कालांतराने महिलांना सर्व प्रकारच्या गोष्टी खुल्या करण्यात आल्या. त्यात अफगाणिस्तान मध्ये महिलांसाठी आत्ता कुठे स्वातंत्र्य मिळू लागले होते. मात्र त्यात ही पुन्हा आता तालिबान ने बंधने घातल्याने पुन्हा इथे महिलांवर बंधने आली. आता तालिबान यापुढे काय निर्णय घेते? की आपला हा भयावह कायदा कायम ठेवून महिलांना दबावातच ठेवणार याकडे संपूर्ण जगाचे (World)डोळे लागून राहिले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here