विकी गवळी
चांदवड : शहरातील वरचेगांव जैन मंदिर ते शनिमंदिर या रस्त्याच्या कडेच्या नाली व रस्त्यावर खड्डे पडुन आतील लोखंडी गज बाहेर निघाले आहेत. त्यामुळे अनेकांना या गजांमुळे दुखापत झालीये.
या रस्त्यावरून साधे चालताही येत नाही याबाबतचे अनेक वेळा निवेदन देखील दिले तरी रस्त्याची दुरूस्ती होत नाही. या परिसरात नैमिनाथ संस्थेचे दोन मोठे वसतिगृह आहेत दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिक येथुन ये जा करतात त्यामुळे वरचेगांवचा हा प्रमुख रस्ता तातडीने दुरूस्त करावा व डासांचे प्रमाण वाढत असल्याने फवारणी करण्यात यावी व रस्त्याच्या बाजूला असलेल्या वेड्या बाभाळींच्या फांद्या रस्त्यावर आल्याने लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तसेच सोमवार पेठेतील रस्त्यावर अनेक ठिकाणी नविन नळ कनेक्शनसाठी रस्त्यावर खटक्या झालेल्या आहेत त्या त्वरीत बुजवून घ्याव्यात व पेठेतील नाले सफाई लवकर करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम