
प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; न्या रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गुरुपीठ श्री त्रंबकेश्वर बाल संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव निमित्त ज्ञानाचा महोत्सव अंतर्गत वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे व शिक्षक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते .
ज्ञानाचा महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी श्री गणपती स्तोत्र श्री गणपती अथर्वशीर्ष पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दि 14 ,15 आणि 16 सप्टेंबर असे 3 दिवस ऑनलाईन पद्धतीने शिक्षक प्रबोधिनी अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजित करण्यात आले होते ही व्याख्याने विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाच्या ग्रुपवर गुगल मिटद्वारे ऑनलाईन पद्धतीने ऐकली
दि 15. सप्टेंबर रोजी ए.बी.बनसोडे यांचे गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा या विषयावर, बाळकृष्ण ठोके यांचे सण ,व्रत वैकल्य व भारतीय संस्कृती तसेच विज्ञान व अध्यात्म या विषयावर ,श्रीमती बी. एस लबांते मॅडम यांचे “चला मराठी समृद्ध करू या”, या विषयावर व्याख्याने झाली
दि 16 सप्टेंबर रोजी सी. आर जाधव यांचे ऑनलाईन शिक्षणाचे महत्व या विषयावर एस एस सूर्यवंशी यांचे मोबाईल संहिता या विषयावर तर एस.सी पंडित यांचे सायबर क्राइम या विषयावर व्याख्याने झाली
17 सप्टेंबर रोजी बा. बा. गुंजाळ सर यांनी न्या रानडे यांचे जीवन कार्य या विषयावर तर गुलाब टकले यांचे निफाडचे ऐतेहसिक महत्व व परंपरा या विषयावर व्याख्याने झाली
दि 18 रोजी विद्यार्थ्यांसाठी पुष्परचना स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे तसेच कागदी फुलांचा बुके बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कागदी फुलांचा बुके बनवणे स्पर्धेत विदयार्थ्यांनी अतिशय सुबक आणि सुंदर बुके बनवले होते.
कागदी बुके प्रदर्शनाला निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ श्रीया देवचके, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता भाग्यश्री सोनवणे , नगरपंचायतीचे करनिर्धारण अधिकारी
हर्षवर्धन मोहिते, न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वि.दा.व्यवहारे, रतन पाटील वडघुले , किरण कापसे, मधुकर राऊत , विश्वास कराड , यांनी भेट दिली

विद्यार्थ्यांनी तयार केलेले कागदी बुके पाहून मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, यांनी विद्यार्थ्यांच्या या कलेचे कौतुक केले व कोरोनाच्या काळात हे विद्यालय विद्यार्थ्यासाठी जे उपक्रम राबवत आहे तो उपक्रम स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या
याप्रसंगी वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.गोरवे, उपप्राचार्य बी.आर.सोनवणे ,पर्यवेक्षक एम.एस.माळी ,पर्यवेक्षक एन.डी. शिरसाट आदी उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम