द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; तालुक्यातील देवपूरपाडे शिवारात रणादेवपाडे गावानजीक बिबट्याने रात्रीच्या वेळेस शेतात बांधलेल्या वासरूवर हल्ला चढवत फस्त केले.
सूचना – सोबत संग्रहित छायाचित्रे वापरले आहे.
रणादेवपाडे येथील जिभाऊ मोतीराम यांच्या गट नं३१९ मधील शेतात बांधलेल्या वासरास रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने ठार केले.
पशु वैद्यकीय अधिकारी प्रवीण आहिरे ,वनक्षेत्रपाल अरुण मोरे, वनरक्षक श्रीमती व्ही.ए.खरात, वनसेवक ताराचंद देवरे आदींनी पंचनामा केला. मागील एका महिन्यात परिसरात बिबट्याने केलेला हा तिसरा हल्ला होता.
त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत.यापूर्वीही येथील बच्छाववाडी वस्तीवरील युवराज सोनवणे व महालपाटणे शिवारातील बाळू खरोले यांच्या मालकीच्या वासरांना बिबट्याने ठार केले होते. दरम्यान महालपाटणे शिवारात बाळू खरोले यांच्या शेतात गेल्या महिन्यापासून पिंजरा लावला असून अजूनपर्यंत बिबट्या पकडण्यात वन विभागास यश आले नाही त्यामुळे शेतकरी दिवसासुद्धा शेतात जायला घाबरत आहेत म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे व लहान मुलांना शेतात घेऊन जाऊ नये, रात्रीच्या वेळी फटाके वाजवावेत व प्रखर उजेडाचे दिवे घराबाहेर,शेतात लावावेत असे आवाहन यावेळी वनक्षेत्रपाल अरुण मोरे, वनरक्षक श्रीमती व्ही.ए. खरात यांनी नागरिकांना केले आहे.
Edit bye – Somnath jagtap
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम