मेहंदीचा रंग उतरण्या आधीच नियतीचा घाला ; नवविवाहितेचा डेंग्यू ने मृत्यू

0
35

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; लोहोणेर (lohaner) ता देवळा येथील शीतल आदित्य शेवाळे (वय – २०) या नवविवाहितेचा( दि २१ ). रोजी डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शीतल व आदित्य (shital ,aditya) यांचा विवाह गेल्या २७ ऑगस्ट रोजी झाला होता .

लग्नानंतर अवघ्या २१ दिवसात शितलचे डेंग्यूने निधन झाल्याने लोहोणेर गावावर शोककळा पसरली आहे . लोहोणेर ता देवळा येथील आदित्य भाऊसाहेब शेवाळे यांच्या पत्नी शीतल आदित्य शेवाळे (२०) यांना गेल्या चार पाच दिवसांपूर्वी डेंग्यू अदृश्य आजाराची लक्षणे दिसून येताच तिला सटाणा (satana) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतेया.

नंतर कुटूंबियांनी शीतलला अधिक उपचारासाठी नाशिकला खाजगी रुग्णालयात दाखल केले . मात्र , उपचारादरम्यान गुरुवारी( दि १६) रोजी पहाटे तीन वाजता शीतलची प्राणज्योत मालवली .

लग्न होऊन अवघ्या २१ दिवसात शीतलचे निधन झाल्याने लोहोणेर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान , देवळा तालुक्यात सद्या डेंग्यू ,मलेरिया व चिकन गुणिया सारख्या साधीच्या आजाराने धैमान घातले असून , देवळा शहरासह ग्रामीण भागातील सर्वच खाजगी दवाखान्यात उपचारासाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे .

तालुक्यातील प्रत्येक गावात व घराघरात या साधीच्या आजाराचे रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीक हतबल झाले असून, आरोग्य विभागाने याची दखल घ्यावी , अशी मागणी करण्यात आली आहे .

Edit bye – Somnath jagtap


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here