नियम मोडले तर तुमचं थेट ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल होणार

0
41

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक पोलीस आयुक्त सध्या ऍक्शन मोडवर असून त्यांनी शहरातील नागरिकांना शिस्त लावण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तुम्ही बाईक चालवून वाहतूक नियम तोडत असाल तर वेळीच सावध व्हावे अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होईल, तुम्ही नियम मोडले तर तुमचं थेट ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल होणार आहे.

असा आदेशच नाशिक पोलीस आयुक्तांनी काढलाय वाहतूक नियम तोडणाऱ्या तब्बल 236 वाहन धारकाची यादी वाहतूक शाखे ने ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी आर टी ओ ला पाठवली आहे. नागरिकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावे या साठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी वेगवेगळ्या पद्धस्तीने नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे त्यात नो हेल्मेट नो पेट्रोल , हेल्मेट न घालणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई न करता 2 तासाचे समुपदेशन करून नागरिकांना त्यांची वाहन परत दिल जाते.

काही वाहनचालक अतिशय बिनदास्त पणे नियम मोडत असतात, मात्र आता नागरिकांनी नियम मोडले तर थेट त्याच लायसन्स रद्द होणार आहे त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे सगळे नियम पाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here