द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गणरायाचा उत्सव हा सगळ्यांच्याच जिवाभावाचा. एक वेगळं आणि मोहक वातावरण गणरायाच्या आगमनाने तयार होते. आणि या गणरायाच्या आगमना सह वेगवेगळ्या आरास करून अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न सगळेच करतात. नाशिक शहरातील बावरी परिवाराने देखील आपल्या घरी गणारायाच्या आगमनाद्वारे एक अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
बावरी परिवाराने यंदा वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत एक अनोखा संदेश आपल्या गणरायाच्या देखाव्यातून दिलाय. बावरी परिवार नेहमीच समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याही वेळी बावरी परिवाराने एक वेगळा संदेश दिला.
चक्क स्वतः गणराय लोकांना वाहतूक नियम पालन करण्याबाबत प्रबोधन करत असल्याचा देखावा बावरी परिवाराने दाखवला आहे. या देखाव्यात हेल्मेटचा वापर, झेब्रा क्रॉसिंग, दिशा दर्शक फलक, वेगमर्यादा अशा अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. जाहिरात फलकातून त्यांनी अनेक गोष्टी प्रकट केल्या आहेत.
नाशिक शहरात पोलीस यंत्रणेद्वारे वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. या मोहिमेस बावरी परिवाराद्वारे देखील अनोखा पाठिंबा दिला गेला आहे. आजवर अनेक प्रकारे बावरी परिवाराने गणेश उत्सवा दरम्यान समाज प्रबोधनपर संदेश दिले आहेत. आणि याही वेळी हा वाहतूक नियमांबाबत अनोखा संदेश देण्यात आलाय. पत्रकार करणसिंह बावरी, प्रीती बावरी, इंदिरा बावरी, भारत सदभैया यांनी हा अनोखा संदेश दिला आहे. गणेशाची मूर्ती स्वतः प्रीती बावरी आणि इंदिरा बावरी यांनी तयार केली आहे.
असा अनोखा संदेश देऊन बावरी परिवाराने आपली समाज प्रबोधनाची परंपरा देखील कायम ठेवली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम